आमच्या विषयी

जागतिक मराठी चेंबर ऑफ कॉमर्स ऑण्ड इंडस्ट्रीज ही खासदार डॉ. मनोहर जोशी यांच्या संकल्पनेतून साकारलेली मराठी भाषा लिहिता, वाचता, बोलता येणा-या. जगभरमध्ये विखुरलेल्या तसेच उद्योन्मुख उधोजकांची एक सामाजिक संघटना आहे. या संघटनेचा मुख्य उद्देश जगभरातील मराठी उद्योजकांना एकत्र आणून अथवा अशा समविचारी संघटनतंच्या एकमेकांच्या सहकार्याने त्यांच्यातील व्यापार उद्यमशीलतेला चालना देणे तसेच युवा-तरुणांमध्ये व्यापार उद्धोगाविषयी आस्था निर्माण कपण्यासाठी त्यांना प्रेरणेची उर्जा देणे हा आहे. आज आमच्या चेंबरचे अध्यक्ष खासदार डॉ. मनोहर जोशी तर कार्याध्यक्ष खासदार शिवाजीराव आढळराव हे आहेत.

जागतिक मराठी चेंबर ऑफ कॉमर्स ऑण्ड इंडस्ट्रीजची स्थापना दिनांक ०६ फेर्बुवारी १९९४ साली त्यावेळचे राष्ट्रपती डॉ. शंकर दयाल शर्मा यांनी दिल्ली येथे तिस-या जागतिक मराठी परिषदेत डॉ. मनोहर जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. जागतिकरणाच्या स्पर्धेत मराठी उद्योजक, व्यापारी आणि व्यावसायिकांच्या विकासाच्या उन्नतीसाठी त्यांना मार्गदर्शन देण्यासाठी चेंबरची स्थापना करण्यात आली आहे. उद्योजकांना उद्योग, व्यापार, निर्यात क्षेत्रातील संधी उपलब्ध करुन देणे, नवे-नवे तंत्रज्ञान व संयुक्त उद्योग-व्यवसायांबाबत माहिती उपलब्ध करुन देणे. विविध बँकांच्या माध्यमातून कर्ज मिळविण्यासाठी विविध गरजू उद्यजकांना चेंबरच्यावतीने मार्गदर्शन करण्यात येते.विविध व्यापा-याच्या माध्यमातून विविध अडचणी व प्रश्नांवर त्यांच्या अथवा त्यांच्या संघटनांच्या माध्यमातून राज्य शासन आणि महानगरपालिकांकडून सोडवणूक करण्यासाठी जरुर ते प्रयत्न केले जातात.

चेंबरच्या शाखा जगभरामध्ये विखुरलेल्या आहेत. यांना उत्तेजन व प्रेरणा देऊन ते वृध्दींगत होण्यासाठी चेंबर सातत्याने प्रयत्न करत असते. म्हणूनच चेंबर सातत्याने आपल्या उद्योगाची भरारी उद्योग क्षेत्रात अबाधित ठेवणा-या मराठी उद्योजकांचा चेंबरच्या वर्धापनदिनी उद्योगरत्न पुरस्काराने गौरव करण्यात येत असतो. आजपर्यंत उद्योग क्षेत्रातील अनेक यशस्वी उद्योजकांना हे पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.

मराठी पालकांची काही दशकापूर्वी आपल्या मुला-मुलींनी उच्च शिक्षण घेऊन कुठे तरी चांगल्या पगाराची नोकरी करावी ही मानसिकता होती. आता मात्र ही मानसिकता मराठी तरूण समाजामध्ये परिवर्तन होताना दिसत आहे. अमूक समाजाच्याच व्यक्ती धंदा करु शकतात ही पूर्वापार असलेल्या मानसिकतेमुळे मराठी तरुण मंडळी उद्योगक्षेत्रात अथवा व्यवसायात येण्यात घाबरत होता. आता हा सारा न्यूनगंड बाजूला सारुन मराठी उद्योजकही भरपूर आर्थिक माया जमवू लागले आहेत. उद्योग क्षेत्रात जात, धर्म आणि भाषा याचं कधी मुल्यमापन हे केलं जात नाही.

धंदा हा काहीना काही खटपटीचे लढे देण्यासाठी असतो. हात-पाय न हलवता मठ्ठ बसून धंदा करता येत नाही. अनेकदा काही प्रसंगी लढाने लागते तर कधी अत्यंत विनम्र होऊन समोरच्यांशी सुसंवाद करावा लागतो. हे मराठी माणसाने करावे म्हणजे प्रत्येक घरातून एक उद्योजक तयार होऊ शकेल.

मराठी मणसांनीच नोक-या निर्माण केल्या तर नोक-यांच्या मागे लागण्यांचा प्रश्नच येत नाही. उद्योग व्यवसायिकतेला मनसिकतेची योग्य ती जोड देऊन आपण प्रयत्न केले तर नवा यशस्वी मार्ग आपल्याला नक्कीच सापडू शकेल. यामुळे आपली पुढची पिढी अधिक आत्मविश्वासाने आपण दाखविलेल्या दिशेने नक्कीच मार्गक्रमण करून कार्यरत होईल. या अशा जिद्दीने, चिकाटीने आणि कष्टाने मराठी माणूस भारतातच नव्हे तर जागतिकीकरणामुळे स-या जगभर आपला उद्योग-व्यापार आदीचा ठसा निश्चित उमटवू शकेल.

महाराष्टातील छोट-मोठे उद्योजक, शेतकरी आणि व्यवसायिक मंडळी यांची भविष्यात आर्थिकदृष्ट्या प्रगती करण्यासाठी राज्याच्या विकासाचा रथ प्रगतीच्या दिशेने घौडदौड करण्यासाठी राज्याच्या मुख्यामंत्र्यांनी, उपमुख्यामंत्र्यांनी आणि उद्योग मंत्र्यानी उद्योग-व्यवसायात चालना देण्यासाठी, त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी विविध चेंबर, तज्ज्ञ मंडळी, संघटना आदीसह महिन्यातून काही दिवस तरी चर्च-विनिमय होणे गरजेचे आहे. हे पारदर्शक कार्यपद्धतिला निश्चितच चांगलं लक्षण ठरू शकेल. यामुळे उद्योगांचे व राज्याच्या विकासाची धोरणे निश्चित करून राज्याच्या विकासाचा रथ पुढे नेण्यास उपयोगी ठरेल. यामुऴे मराठी उद्योजकांना, शेतक-यांना आणि छोट्या मोठ्या व्यवसायिकांना दूरदृष्टी आणि वेगळे काही तरी करून दाखविण्याची निश्चितच प्ररणा मिळू शकेल.

उद्योजकात ऊर्जा आणि नवनिर्मितीची ऊर्मी असली म्हणजे तो त्यांच्या उद्योगक्षेत्रात प्रज्ञा आणि प्रतिभेचा कस आपणच निर्माण करून शकतो. मराठी माणसाच्या मनातील उद्योगाविषयीचा न्यूनगंड दूर होण्यासाठी निश्चितच चेंबरच्यावतीने प्रयत्न केला जात आहे. याच भूमिकेतून चेंबरने मराठी विद्यार्थी- विद्यार्थीनींनी नोकरीच्या शोधात न फिरता व्यापार उद्योगाची कास धरावी यासाठी त्यांना प्रोत्साहन व मार्गदर्शन देण्याच्या उद्देशाने चेंबरच्या उद्योगप्रेरणा सारखे कार्यक्रम दरवर्षी आयोजित करत असतो.

Upcoming events

SEP

2016

General Body Meeting

The 5th General Body Meeting will be held on 23rd September 2016 at 5.00 PM at Kohinoor Hall, Prabhadevi, Mumbai.

DEC

2016

Function Udyogbhoomi:2016

JMCCI is in the process of planning a grand function to falicitate hon.Shri Subhash Desai,Industry Minister Gov. of Maharashtra

JAN

2017

Udyog Award 2017

JMCCI is in the process of short listing the awardees for 2017.

Become a member Do you have some questions? Fill the form and get an answer!

Contact


Address :

Jagatik Marathi Chamber of Commerce and Industries

(Sec. 25 Company Registration No. U93030MH2011NPL221090)
(now section 8 of Co's Act, 2013)
2nd Floor, Rukmini Niketan,
Near Post Office Ranade Road, Dadar (W);
Mumbai - 400 028

Email : jmccihq@gmail.com Landline : +91-22-2436 7789


Request information

500 characters remaining